#VarshaGaikwad #School #StateGovernment #MhaarashtraTimes
राज्यातील शाळा सुरू करताना मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून सरकारचे सातत्याने शाळांवर लक्ष आहे. काही ठिकाणी विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे शाळा सुरू किंवा बंद ठेवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज संगमनेर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला.